पुणे: सीएनए गॅसच्या दारात कंपनीने वाढ केली आहे.
९ सप्टेंबर च्या मध्यरात्रीपासून पुणे शहरात, पिंपरी-चिंचवड आणि चिकण, तळेगाव, हिंजवडीसारख्या लगतच्या भागांमध्ये, वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या कंप्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या किरकोळ किमतीत ०.९० रुपये प्रति किलोची वाढ झाली आहे. नवीन दरानुसार CNG ची किंमत ८५.९० रुपये प्रति किलो असेल.
या वाढीचा मुख्य कारण म्हणजे CNG साठी वापरल्या जाणाऱ्या गॅसचा खर्च वाढला आहे. तरीही, हा वाढलेला दर पेट्रोलच्या तुलनेत सुमारे ४९% कमी आणि डिझेलच्या तुलनेत सुमारे २७% कमी असून, ऑटो रिक्षांसाठी हा दर सुमारे २९% कमी आहे.
घरगुती पाइपड नॅचरल गॅस (PNG) च्या किमतीत कोणतीही बदल होणार नाही असे कंपनीने कळवले आहे.
सर्व ग्राहकांनी या किंमत वाढीची नोंद घ्यावी, अशी विनंती केली जाते.